Showing posts with label Reliace Energy. Show all posts
Showing posts with label Reliace Energy. Show all posts

Thursday, June 25, 2009

नमस्कार
मी पहिल्यांदाच अस्स काहीतरी लिहित आहे which is called blog. पण आजकाल जे काही आपल्या आजुबाजूला चाललय ते पहाता अस वाटल की आपण ह्यावर लिहून आपल मन मोकळ कराव म्हणुन हा ब्लॉग सुरु करत आहे. 'anything and everything'. आपण ह्या देशात व्यवस्थित रहात असून सुद्धा आपल्यावर बाकी कुणापेक्शाही राजकारणीच कसे अन्याय करतायत किंवा कसे आपल्याला उल्लू बनवत आहेत. ह्या सगळ्या बद्दल माझ मत काय आहे ते मांडल्याशिवाय राहवेना म्हणून ह्या elctronic media चा आधार घ्यावासा वाटला. आता साधच बघा नाही आता Reliance Energy ने आपल बील वाढवलय. शिवसेनेने मोर्चा नेला अजुनही चर्चा सुरु आहेत, आणि २०० ते ४०० रु वाढ झालीय ती एक ५० रु नी कमी होईल, म्हणजे शिवसेनेला सुद्धा आपण काहीतरी केल्याचा समाधान आणि Reliance ची पण चलती, पुन्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्याच आहेत म्हणजे शिवसेनेला त्याचा फायदाच आहे. माझ उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा कुठल्याही पार्टीला आव्हान आहे की त्यांनी Reliance Energy ची बिल्समधली वाढ रोखून जुन्या rate मध्येच ५० ते १०० रु कमी करावे. का? का फक्त मुम्बैकरानीच बील वाढीला तोंड द्यायच? दिल्लीत गेले ६ वर्ष एक पैसा सुद्धा बील वाढ झालेली नाही. ह्यावर कही विचार करण्याची गरज आज एका तरी पार्टीला वाटते का? सामान्य माणुस असलो तरी सुशिक्षित आहोत हे विसरु नका आणि जर आम्ही सुशिक्षित सामान्य माणस भडकलो तर फारच अघटित कही तरी घडेल हे लक्षात असू द्या