Saturday, June 27, 2009

RESERVATIONS

१० वी ची परिक्षा झाली. सगळी मुलं सध्या धावतायत admissions साठी.
कशाही पद्धतीने का होईना पण admission आपल्याला हव्या त्या stream ला मिळाली पहिजे हयासाठी सगळी धडपड चालली आहे. ह्या मध्ये महत्त्वाच्या गोष्टीला त्यांना तोंड द्यावं लागतंय आणि ती गोष्ट म्हणजे Reservations.
Reservations मुळे अनुसुचित जाती जमातीतील मुलांना कमी टक्क्यांना admission मिळते हे आपणा सर्वांना माहित आहेच. त्यामुळे हे सगळे Reservation वाले खूप खुष असतात. पण ह्यामध्ये त्यांचच किती नुकसान आहे ह्याचा ते स्वतः विचार सुद्धा करत नाहीत ह्याचं जास्तं वाईट वाटतं.
सहाजिकच माझ्या या बोलण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं असणार. पण विचार करा,
१. सगळ्या क्षेत्रात कमी टक्क्याला admission मिळते म्हटल्यावर कशाला कोण जास्त अभ्यास करेल?
२. जास्त अभ्यास न केल्याने त्यांचीच प्रगती खुंटते. Open category मधली मुलं मात्र admission मिळावी म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करतात आणि ती जास्त प्रगल्भ होत जातात.
ह्यासाठी मी कुठल्याही जातीतल्या माणसाला दोष देणार नाही, कारण जर आपल्याला सवलत मिळत असेल तर कुणीही त्याचा फायदा घेणारच, किंबहुना घ्यायलाच पाहिजे. पण ह्यामुळे आपली प्रगती थांबवायची का? हा मह्त्त्वाचा मुद्दा आहे. सवलती देणारे फक्त स्वतःचा फायदा बघतायत - कसा? काय होतं Reservations मुळे तुम्ही खुष होता आणि सवलती देणारे आपले ‘मायबाप’ असं आपल्याला वाटायला लागतं पण तुमच्या मधल्या कमी शिक्षणाचा फायदा ते तुमच्यावर अधिराज्य गाजविण्यासाठी घेतात, त्यांच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागविण्यासाठी घेतात, आणि दुर्दैव असं की हा विचारसुद्धा तुमच्या मनाला शिवत नाही, पुन्हा एकदा कारण शिक्षणच.
तुम्ही स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजता पण त्यांची शिकवण काय होती ह्याचा विचार करण्याची तरी कुवत बाळगा. Reservations ची काठी फार विचार करून बाबासाहेबांनी तुम्हाला देऊ केली होती, की जिच्या आधाराने तुम्ही वर चढाल. पण आज खरच तुम्ही वर आलायत का? सगळे जण ज्या वेगात स्वतःची प्रगती साधतायत त्या वेगाला सामोरं जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? मला विचाराल तर नाही, कारण एकच तुम्हाला मिळालेली Reservations ची सवलत. बाबासाहेबांनी तुम्हाला देऊ केलेली ही १० वर्षांच्या Reservations ची काठी, जिच्या आधाराने तुम्ही वर चढायचं, आणि ती काठी फेकून द्यायची तर आज ती काठी तुमची गरज बनलीय, जीच्यामुळे तुमची प्रगती तुम्ही स्वतःच थांबवताय. बाबासाहेब खूपच थोर विचारवंत होते, त्यांनी तुम्हाला मदत केली पण त्या मदतीला तुमची गरज बनवण्य़ाचं काम हे आजच्या राजकारण्यांनी केलं, ज्या त्याच्या खेळीला तुम्ही बळी पडला आहात. राजकारण्यांची खेळी ही तुम्हाला समाजापासून वेगळं करण्याचीच आहे, कारण तुम्हाला वेगळं केल्यावरच तुमच्यावर अधिराज्य गाजवणं सोपं जाणार आहे. पण तुम्ही आपल्या समाजापासून वेगळं होऊ नये ही माझी तळमळ आहे आणि म्हणून मी तुम्हाला सावधान करत आहे. अजुनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, जागे व्हा - खूप अभ्यास करा. स्वतःला प्रगल्भ बनवा. ह्या समाजात स्वतःला सिद्ध करा आणि बाबासाहेबांचं नाव मोठ्ठ करा.
Reservations चा वेगळा विचार सुद्धा करता येऊ शकतो.
तुम्ही Reservations घ्या पण टक्क्यात नाही. तुम्ही ९० टक्के मिळवा आणि Open category च्या आधी admission घ्या, हे ही Reservation च आहे. ज्यामुळे तुम्ही अभ्यास करायला प्रवृत्त व्हाल, आणि मग समाज सुद्धा तुमच्याकडे अभिमानाने बघेल. आणि मला खात्री आहे की आजची तरुण पिढी हा अभिमान आपल्या समाजाला मिळ्वून देईल. नक्कीच.
मी हे सगळं diplomatically लिहीलं नाहीये. मी जात-पात मानत नाही. माझ्या समाजातल्या कुठल्याच माणसाचा शिक्षणाचा अधिकार हा कुठल्याही राजकारण्याच्या स्वार्थापोटी त्याने गमावू नये, आणि प्रत्येक माणसाला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती यावी ह्या कळकळीने लिहिलं आहे.

1 comment: